महाराष्ट्र कोकणासाठी 62 होळी विशेष गाड्या! मुंबई – नागपूर आणि पुणे – नागपूर दरम्यानही विशेष फेऱ्या
मुख्य संपादक

महाराष्ट्र कोकणासाठी 62 होळी विशेष गाड्या! मुंबई – नागपूर आणि पुणे – नागपूर दरम्यानही विशेष फेऱ्या
महाराष्ट्र ,
दि.14/3/25
एकाच वेळी गर्दी वाढल्याने अनेक प्रवाशांना रेल्वे गाड्यांमध्ये जागाच मिळत नाही. मिळेल त्या जागेवर प्रवासी बसत असल्याने कन्फर्म तिकिट काढून बसलेल्या प्रवाशांसह सर्वांनाच त्याचा त्रास होतो. त्यामुळे अनेक जण ऐनवेळी आपल्या गावाला जाण्याचे नियोजन रद्द करतात. त्यामुळे त्यांच्या सणाच्या आनंदावर काहीसे विरजण पडल्यासारखे होते.
हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त प्रवाशांना त्यांच्या गावात जाऊन सण साजरा करता यावा म्हणून मध्य रेल्वेने देशभरात १८४ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ६२ गाड्या महाराष्ट्रातील विविध भागात धावणार आहेत. या गाड्यांमध्ये वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि जनरल कोचही राहणार आहेत. या गाड्या आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही स्वरूपात राहणार आहेत.