देश-विदेश
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक ; 25 लाखांच्या इनामी नक्षलवाद्यासह तीन ठार…
मुख्य संपादक

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक ; 25 लाखांच्या इनामी नक्षलवाद्यासह तीन ठार…
छत्तीसगड
दिनांक 26/3/25.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे. गृहमंत्र्यांच्या घोषणेनुसार, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची तीव्र कारवाई सुरू आहे. मंगळवारी दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये 25 लाखांचे बक्षीस असलेल्या सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन इंसास रायफल, 303 रायफलसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला. सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.