
मंडळ अधिकारी व तलाठी एसीबीच्या जाळ्यात ।
सहा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक …
गडचिरोली
दिनांक 3/8/24.
ब्रेकींग न्युज .
सहा हजाराची लाच घेताना तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
व्यंकटेश जल्लेवार वय 40 वर्ष तलाठी महागाव साझा ता. अहेरी व भूषण जवंजाळकर वय 38 वर्ष मंडळ अधिकारी खमनचेरू ता. अहेरी असे लाचखोर आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराला तीन व्यक्तीच्या नावाने असलेल्या जमिनीचा फेरफार करून सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी व्यंकटेश जल्लेवार यांनी स्वतः साठी व मंडळ अधिकारी भूषण जवंजाळकर यासाठी प्रत्येकी चार हजार पाचशे याप्रमाणे नऊ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती दोघांनी तीन हजार रुपये प्रमाणे सहा हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले मात्र तक्रार दाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
गडचिरोली येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सहा हजार रुपयांची लाच घेताना तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला अटक केली. याप्रकरणी अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्यास लाच घेताना अटक झाल्यानंतर आज तलाठी व मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने जिह्यातील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.