
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा धडकला..
गडचिरोली
दिनांक 20 /01/ 2025.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी …
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा धडकला या मोर्चा त संपूर्ण जिल्ह्यातील विविध आस्थापनेवर काम करीत असलेले युवा प्रशिक्षणार्थी एकवटून आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चातील मागण्या खालील प्रमाणे युवा कार्य प्रशिक्षणाचा कार्यकाल वाढवून द्यावा . वेळेवरती विद्यावेतन मिळावं. नोकर भरती मध्ये कायमस्वरूपी सामावून घ्यावं ह्या प्रमुख मागण्या घेऊन जिल्हा कचेरीवर धडक देण्यात आली. त्यावेळी या मोर्चाला पाठिंबा, समर्थन आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचे खासदार मा. डॉ. नामदेवरावजी किरसान साहेब यांनी उपस्थित होते तसेच काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्र बामणवाडे ,धर्मानंदजी मेश्राम जिल्हा प्रभारी आझाद समाज पार्टी गडचिरोली ,मा. राज बनसोड जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टी गडचिरोली, मा. विवेक खोब्रागडे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष गडचिरोली, रुपेश जी टिकले बहुजन समाज पार्टी गडचिरोली, जिल्हाध्यक्ष सद्गुरु जिल्हाध्यक्ष ,सतीशजी विधाते जिल्हाध्यक्ष ,भास्कर जी मेश्राम जिल्हाध्यक्ष, नागसेन मेश्राम आधी संपूर्ण मंचावर उपस्थित होते.
तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय रामदास मसराम साहेब यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा व समर्थन दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा या मोर्चात सामील होते. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तुमचा लढा असाच उभा राहणार तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी राहू व जिथे तुम्हाला आवश्यकता व अडचण भासत असेल आणि जिथे जिथे तुमच्यावर अन्याय होत असेल त्या त्या वेळेस मी तुमच्या पाठीशी उभा राहील वेळ आली तर रस्त्यावर उतरण्याची वेळ येत असेल तरी मी तुमच्या सोबत राहून रस्त्यावर सुद्धा उतरेल अशी भूमिका व असे स्पष्ट मत मांडले . तेव्हा सर्व प्रशिक्षणार्थायांकडून मा.आमदार मसराम साहेब यांचा खरोखर मनभरुन कौतुक केले. सर्व प्रशिक्षणार तर्फे अभिनंदन करण्यात आले. आणि पुढे असेच हे आंदोलन सुरू ठेवा असे सांगत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला.
तसेच या मोर्चामध्ये सहभागी असलेले गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण युवा कार्यप्रशिक्षणार्थी चार ते पाच हजाराच्या संख्येने उपस्थित होते .त्यावेळी जिल्हाधिकारी याच्याकडे निवेदन देण्यात आले.
जिल्हाघ्यक्ष दशरथ कोवे, उपाध्यक्ष बन्सोड, सचिव पंकज नैताम यांच्या, नेतृत्वाखाली आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी मिळुन हा मोर्चा यशस्वी पार पाडला.