
वळणावर ट्रॅकटर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात बापलेक ठार .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली
एटापल्ली :
स्वतःच्या गावावरुन दुचाकीवर एटापल्ली येथे कामानिमित्त येत असताना बापलेकीचा ट्रॅकटरच्या दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
सदर घटना एटापल्ली गटा मार्गावरील महादेव मंदिर वळणावर बुधवारी सकाळी
11 वाजताच्या दरम्यान घडली.
अपघातात राजू झुरु आत्राम वय 49 व करिश्मा आत्राम वय 20 मुक्काम देवपहाडी असे आहे.
अपघात इतका जबरदस्त होता की दुचाकीस्वराच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला.व दुचाकीच्या मागे बसलेली मुलगी गँभीर जखमी झाली.तिला गडचिरोली येथील रुग्णालयात नेत असतांना ती वाटेतच मरण पावली.सदर ट्रॅकटर ही सिमेंट व लोखंडी पोल घेऊन एटापल्ली वरून गटा मार्गे जात होती.दोन्ही वाहनांची महादेव मंदिराच्या वळणावर धडक झाली