अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार…
मुल / सावली
ब्रेंकिग न्युज .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दि 31 डिसेंबर 2023 .
सावली तालुक्यातील बोथली येथील विक्की अजय कोंकावार हा युवक बोथली येथून सावली ला येत असतानाच सावली जवळील वाढई यांच्या शेताजवळ त्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वर असलेला युवक विक्की हा जागीच ठार झाला.अपघाताची माहीती मिळताच सावली पोलिसांनी त्याला सावली ग्रामीण रुग्णालयात भरती केले मात्र तो गतप्राण झालेला आहे.मृतक युवक हा व्याहाड खुर्द येथील नारायणी वाइन बार मध्ये तो गेल्या 2 महिन्यापासून कामावर होता. एक चांगला होतकरू युवक चा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
कोणत्या अज्ञात वाहनाने धडक दिली याचा तपास सुरू असून धडक मारलेला वाहन हा बोथली रोड च्या दिशेने गेल्याचे कळते आहे.