Breaking
ब्रेकिंग

मुलचेरा येथे रॅलीतुन स्वच्छता व अमृत कलश मोहीम जनजागृति!

कार्यकारी संपादक:- अनुप मेश्राम

 

 

मुलचेरा येथे रॅलीतुन स्वच्छता व अमृत कलश मोहीम जनजागृति 

गडचिरोली.(दि.01नोव्हेबर

दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.

  कार्यकारी संपादक .

अनुप मेश्राम.

मुलचेरा :-/ 

नगर पंचायत मूलचेरा अंतर्गत स्वच्छता ही सेवा,स्वच्छता पंधरवडा,तसेच माझी वसुंधरा अभियान,मेरी माटी मेरा देश,एक तारीख एक तास एक साथ श्रमदान अंतर्गत शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीला हिरवी झेंडी नगराध्यक्ष विकास नैताम यांनी दाखवली.

      सदर रॅली शहिद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा मूलचेरा येथून मेन चौक मूलचेरा, बुद्धविहार,जय सेवा चौक,नगरपंचायत कार्यालय मुलचेरा,राणी दुर्गावती चौक ते सम्पूर्ण शहरात फिरवून शहिद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा मूलचेरा येथे रॅली चा समारोप करण्यात आला.रैलीतुन स्वछतेविषयी तसेच अमृत कलश यात्रेविषयी जनजागृति करण्यात आली.

नागरिकांकडुन पवित्र माती कलशामधे सम्पूर्ण शहरामधुन जमा करण्यात आली.तसेच माझी वसुंधरा,पंचप्राण व स्वच्छता शपथ घेण्यात आली.यावेळी रैलीत नगराध्यक्ष विकास नैताम, उपनगराध्यक्ष मधुकर वेलादी,नगरसेवक उमेश पेडूकर,रेखा कुमरे,सुनिता कोकेरवार,मोहना परचाके,सुनीता कुसनाके,काशिनाथ कन्नके, बंडू अलाम,दिलीप आत्राम,विजय कुलमेथे,मनीषा गेडाम,संतोष चौधरी,मंगला आलाम,जस्वानंदा गोंगाले,सपना मडावी,यामिना हिवरकर,देवाजी चौधरी,अब्दुल शेख नगर पंचायत चे मुख्याधिकारी सर्वेश मेश्राम,शहिद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा मूलचेरा चे हेड मास्टर प्रल्हाद मंडल सर,डॉ,श्रीराम महाकरकार,अभिजित दखणे,अमोल करकाडे,संजकुमार कदयाम,सुधाकर वेलादी,नेहरू युवा केन्द्राचे समन्वयक कैलाश बंकावार, नगरपंचायत मूलचेरा चे लिपिक हरीश खेडकर,जगदीश वाढई,शहर समन्वयक मिनार खोब्रागडे,दिलीप रामटके, मनोजकुमार मेश्राम तसेच स्थानिक नागरिक व विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते.यावेळी जनजागृति करण्यात आली तसेच श्रमदान करून शहर स्वच्छ करण्यात आले.

स्वच्छता पंधरवाडा 15 सेप्टेंबर 2023 ते 1 ऑक्टोबर च्या दरम्यान सफाई कर्मचारी सत्कार,कार्यालय साफसफाई,शहर स्वच्छता,मानवी साखळी,स्वच्छता शपथ असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे