
नगर पंचायत भिवापूर येथे अग्निशमन वाहनचे लोकार्पण – आमदार राजु पारवे यांच्या हस्ते
नागपुर / भिवापुर .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 23/02/2024 रोज शुक्रवारला नगर पंचायत भिवापूर येथे अग्निशमन वाहनचे लोकार्पण करण्यात आले.
भिवापूर शहर व तालुक्यातील नागरिकांना या गाडीचा लाभ होणार असून. या अगोदर गरज भासल्यास अग्निशमन वाहन हे उमरेड किंवा नागपूर वरून बोलवावे लागत होते. परंतु नगर पंचायत भिवापूरला आता त्यांच्या हक्काची गाडी उपलब्ध करून दिल्यामुळे, नागरिकांची गैरसोयीपासून सुटका होऊन त्यांना तात्काळ कुठे आग लागली तर ती विझवण्यासाठी अग्निशमन वाहनाचा उपयोग होईल..
या वेळी सभापती सौ.माधुरीताई देशमुख, जि. प. सदस्य श्री.शंकर डडमल, सौ.नेमावलीताई माटे, उपसभापती श्री.राहुल मसराम, प. स.सदस्य श्री.कृष्णा घोडेस्वार, सौ.ममता शेंडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्री.बाळू इंगोले, उपसभापती श्री.चंद्रशेखर ढाकूणकर, मुख्याधिकारी श्री.मिलिंद साठवने, संचालक श्री.सुशील मेश्राम, श्री.संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष श्री।लव जनबंधू, माजी नगरसेविका सौ.वंदना जांभुळकर, श्री.प्रमोद गोजे, श्री.रमेश बोराडे, श्री.नितीन रघुशे, श्री.रमेश भजभूजे, श्री.पुरुषोत्तम फाये, पुष्पलता मदने, श्री.सुनील पौनीकर, श्री.अनिल चणेकर, श्री.अनिल आगलावे, श्री.अमित आगलावे, श्री.गजानन वाघमारे, श्री.कुमार धनविजय, श्री.बालू कपाटे, श्री.जयंता उमरेडकर तसेच नगर पंचायत पदाधिकारी, नागरिक तथा पत्रकार बंधू उपस्थित होते.