
बकऱ्या चारणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून केले ठार..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि .26 /02/2024.
चंद्रपूर / राजुरा :-
बल्लारपूर शहरालगत कारवा मार्गातील जंगलात बकरी चराईला गेलेल्या बल्लारपूर येथील लालबची चौहान या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी 12 वाजेच्या दरम्यान घडली या घटनेमुळे या परिसरात वाघाची दहशत पसरली असून वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावून गस्त वाढविली आहे.बल्लारपूरातील दीनदयाळ वार्डात राहणारे रामाअवध चौहान आपल्या पत्नी लालबची सोबत नेहमीप्रमाणे कारवा मार्गावरील जंगलात बकरी चारायला गेले होते बल्लारपूर पासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरील ही घटना आहे बकरी चराई करीत असतानाच जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने पती समोरच पत्नी लालबची यांचेवर हल्ला करून ओढत नेले पतीने आरडाओरड करून लोकांना आवाज दिला त्यामुळे वाघाने तिला सोडून पळून गेला पत्नीजवळ जाऊन पहाताच पत्नीचा मृत्यू झाला होता.
लोकांचाही जमाव झाला लगेच पोलीस व वन विभागाचे कर्मचाऱयांना बोलाविण्यात आले शव ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे वन कर्मचाऱयांनी लगेच मोका पंचनामा करून या भागात ट्रॅप कॅमेरा लावलेले असून गस्त सुद्धा वाढविली आहे असे वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी सांगितले .या क्षेत्रात वाघाचा वावर सुरू असल्याने वन कर्मचारी वारंवार सूचना देऊनही काही लोक मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अश्या दुर्दैवी घटना घडत आहे .तरी जनतेने आता सावध राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.