
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली,
दिनांक 16/2/25
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आज मध्यरात्री भीषण घटना घडली आहे. स्थानकावर मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन १८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून यातून घटनेची भीषणता स्पष्ट होत आहे.
नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाला. असंख्य प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांच्या वारसांना आणि जखमींना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये, तर जखमींना अडीच लाख, तर किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.
शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला. इतर अनेक जण जखमी झाले असून त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.