
अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार; मध धोरणाचा CAG ,अहवाल PACकडे पाठवला जाणार ।
दिल्ली ,
दिनांक 27/2/2025.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आप सरकारच्या काळातील मद्य धोरणाबाबत कॅगचा अहवाल आज विधानसभेत सादर केला. या मद्य धोरणामुळे राज्याला 2 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. दरम्यान, आता हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी PAC कडे (पब्लिक अकाउंट्स कमिटी) पाठवला जाणार आहे. PAC या अहवालावर विचार करेल आणि आपला अहवाल विधानसभा अध्यक्षांना सादर करेल.