
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला
पुणे ,
काँग्रेसला महाराष्ट्रात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिलेला आहे. धंगेकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दरम्यान, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले.