
ऐतिहासिक ईडन गार्डनवल्फ बोर्डाची मालमत्ता, ममता बॅनर्जीच्या सरकारमधील मंत्र्याचा दावा ।
पश्चिम बंगाल,
दि.13/3/25.
मागच्या काही काळामध्ये वक्फ बोर्ड हा देशात चर्चेचा विषय ठरला आहे. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडलेलं असल्याने वक्फचा मुद्दा अधिकच संवेदनशील बनला आहे. दरम्यान, या वक्फ बोर्डाकडून विविध मालमत्तांवर दावा सांगितला जात असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. दरम्यान, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री सिद्दिकुल्ला चौधरी यांनी वक्फ बोर्डाच्या मालमत्तांबाबत असंच एक धक्कादायक विधान केलं आहे. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील क्रिकेटचं ऐतिहासिक मैदान असलेलं ईडन गार्डन आणि फोर्ट विल्यम इमारत हे वक्फ बोर्ड म्हणजेच मुस्लिमांची मालमत्ता होते, असा दावा सिद्दिकुल्ला चौधरी यांनी केला आहे.