मुंबई
मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडीचा दुसरा बोगदाही खुला शिमगोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर
मुख्य संपादक

मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडीचा दुसरा बोगदाही खुला शिमगोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर
मुंबई ,
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित व प्रतीक्षेतील कशेडी घाटाला पर्याय असणारे दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुले झाल्याने शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. बोगद्यातील वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.