
मुंबईतील सर्वात मोठा करार ! 85 वर्ष जुन्या बंगल्याची तब्बल 276 कोटींना विक्री..
मुंबई ,
दि.25/3/25.
मुंबईमध्ये एकापेक्षा एक महागड्या इमारती आहेत. पण, सध्या मुंबईतील 85 वर्षे जुनी इमारत चर्चेत आली आहे. नेपियन सी रोडवर 1940 मध्ये बांधलेला एक बंगला विकला गेला आहे. अतिशय जीर्ण आणि खराब अवस्थेत असलेला हा बंगला त्याच्या किमतीमुळे चर्चेत आहे. स्वातंत्र्यापूर्वी बांधलेला हा बंगला तब्बल 276 कोटी रुपयांना विकण्यात आला आहे.
मुंबईतील नेपियन सी रोडवर 1940 मध्ये बांधलेला लक्ष्मी निवास बंगला विकण्यात आला आहे. 2221 स्क्वेअर यार्ड परिसरात बांधलेल्या या बंगल्याला नवीन खरेदीदार मिळाला आहे. एकेकाळी स्वातंत्र्याच्या चळवळीचे केंद्र असलेला हा दुमजली बंगला आता मुंबईच्या बाजारपेठेतील सर्वात महागड्या रिअल इस्टेट व्यवहारांपैकी एक आहे. या बंगल्यासाठी मिळालेल्या किमतीमुळे तो चर्चेत आला आहे.