Breaking
क्राईम

आई बनली हैवान, बाँयफ्रेंडच्या मदतीने मुलीवर केले अत्याचार ,पुरावे लपविण्यासाठी ट्रक समोर फेकले शरीर….

मुख्य संपादक

 

आई बनली हैवान, बाँयफ्रेंडच्या मदतीने मुलीवर केले अत्याचार ,पुरावे लपविण्यासाठी ट्रक समोर फेकले शरीर….

हरीयाना ,

२१ मे रोजी कैथल जिल्ह्यातील रादौरमधील धौलरा गावात रस्ता ओलांडताना १५ वर्षीय मुलीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, आय प्रकरणाचा तपास करत असताना मुलीच्या आईने केलेले काळे कृत्य सगळ्यांमोर आले. आईनेच आपल्या बॉयफ्रेंडकडून १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करवला आणि नंतर तिची हत्या केली.

मुलीची हत्या केल्यानंतर तो अपघात वाटावा म्हणून आईनेच तिचा देह रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकसमोर फेकला. ही घटना अपघातसदृश्य दिसावी म्हणून ट्रक चालकालाही या योजनेत सामील करून घेण्यात आले होते. मात्र, मुलीच्या श्राद्धा दिवशी महिलेने ही सगळी घटना आपल्या पतीसमोर कबूल केली. आपल्या मुलीचा मृत्यू अपघातात झाला नसून, आपणच बॉयफ्रेंडच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केला आणि या दरम्यान तिला दिल्या गेलेल्या गुंगीच्या औषधाची मात्रा अधिक झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं आईने कबूल केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे