
नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या भुतानच्या 27 वर्षीय तरुणीवर सात जणांकडून अत्याचार ..
पुणे ,
दि10/4/25.
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शंतनू कुकडे याला बलात्कार प्रकरणात अटक केली. त्यानंतर पोलिस तपासात वकिलासह सहा जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयाने दि. १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.