उमरेड येथे आ.राजु पारवे यांच्या हस्ते 75 फूट झेंडाचे झेंडावंदन करून सलामी दिली .
दिनांक 15/08/2023.
तसेच नगर काँग्रेस कमेटी च्या वतीने आयोजित टिळक चौक व तहसील कार्यालय उमरेड येथे झेंडावंदन कार्यक्रमाला उपस्थित राहून मानवंदना दिली व उपस्थित सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा दिल्या. देशाने स्वातंत्र्याचे अमृत वर्ष पूर्ण केले असून आज जागतिक पातळीवर देशाचं नावलौकीक होत आहे यात देशातील कामगार, कष्टकरी, आणि सर्व सामान्य माणसाची महत्वाची भूमिका आहे. जात, पात, धर्म बाजूला ठेवून आज पुन्हा नव्याने आपल्याला या देशाच्या उभारणीसाठी कार्य करायचं असून बंधुत्वाची भावना जोपासायची आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले .त्या सर्वांना आजच्या दिनी मी कोटी कोटी अभिवादन करतो असे बोलत त्यांनी आपल्या शब्दाना पुर्ण विराम दिले.