दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने ,येनापुर येथे बँरीकेड्सला दुचाकींची जबर धडक ,दुचाकीस्वार गंभीर जखमी .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक संतोष मेश्राम
गडचिरोली ,
चामोर्शी / येनापुर
दिनांक 28/ 02/2024.
येनापुर येथे मुख्य रस्त्यावर लावुन असलेल्या बँरीकेड्सला दुचाकींची जबर धडक ,दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 28/02/2024 ला बुधवारी रात्रो 9.20. वाजताच्या सुमारास घडली.
गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव श्री .प्रविण आत्राम वय 30 वर्ष असुन रा.राजगोपालपुर ता.चामोशीँ जि.गडचिरोली येथील रहिवासी आहे. प्रविण हा आपल्या दुचाकीने कोनसरी कडुन आपल्या राजगोपालपुर गावाकडे जात असतांना येनापुर येथे मुख्य रस्त्यावर लावुन असलेल्या बँरीकेड्सजवळ समोरुन येणाऱ्या वाहणाच्या लाईटमुळे दुचाकीस्वार प्रविण याचे डोळे दिपल्याने दुचाकीस्वार लावुन असलेल्या बँरीकेड्सला जबर धडक दिली यात दुचाकीस्वार प्रविण हा गंभीर जखमी झाला. व तात्काळ येनापुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.