
दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत, एकुलता एक मुलगा ठार…
चामोर्शी ,
येनापुर :- दि. 6/4/24.
चामोर्शी तालुक्यातील येणापूर जवळील देशबंधू चित्तरंजनदास हिंदी हायस्कूल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन एक युवक ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.आयुष सुरेश चोखारे (१८, रा. लक्ष्मणपूर) असे मृतकाचे नाव आहे. आयुष हा आपल्या दुचाकीने येणापूरकडून चामोर्शीकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. शेजारच्या लोकांनी आयुषला येणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र,त्याची प्रक् ति चिंताजनक असल्याने ,
त्याला चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आयुष हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. शनिवारी सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी एकच टाहो फोडला.तसेच गावात शोककळा पसरली आहे.