
उमरेड व संताजी युथ फॉउंडेशन, उमरेड तर्फे गुणवंत विद्यार्थीचा सत्कार समारंभ…….
मुख्य संपादक ,
संतोष मेश्राम
नागपूर :- उमरेड ,
आज दिनांक 30 जुलै 2023 रोज रविवारला पं. दीनदयाल उपाध्याय नाट्य सभागृह उमरेड येथे संताजी फॉउंडेशन, उमरेड व संताजी युथ फॉउंडेशन, उमरेड तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचे उदघाट्न राजुभाऊ पारवे आमदार उमरेड यांच्या हस्ते करण्यात आले.
समाजातील गुणवंत विद्यार्थी हेच समाजाचा खरा दागिना असून त्यांचाच माध्यमातून पुढे समाज घडत असतो. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देणे हे आपल्या सर्वांचे सामाजिक दायित्व असते. आज याच प्रसंगी सर्व गुणवंतांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना अनंत शुभेच्छा दिल्या.
या वेळी ॲड. आनंदराव गिरडकर ज्येष्ठ विधिद्य उच्च न्यायालय, विकासजी झाडे ब्युरो चीफ, दै. सकाळ, सभापती गीतांजली नागभीडकर, पं. स. सदस्य पुष्कर डांगरे, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, संताजी फॉउंडेशन अध्यक्ष विलास मुंडले, उपाध्यक्ष जगदीश वैद्य, सचिव मंगेश गिरडकर, अरविंद हजारे, सतीश कामळी, सुरज इटणकर, उमेश वाघमारे, विशाल देशमुख, प्रशांत धोके, जितेंद्र गिरडकर, सतीश कामडी, केतन रेवतकर, अमित लाडेकर, रोशन झाडे, नितेश कळंबे, तसेच संताजी फॉउंडेशन चे सर्व पदाधिकारी व गुणवंत विध्यार्थी उपस्थित होते.