
2030 पर्यंत 9 कोटी लोकांच्या नोकऱ्या संकटात ! वर्ल्ड इकाँनाँमिक फोरम रिपोर्ट मध्ये खुलासा…
दिनांक 12/01/2025.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा फ्यूचर ऑफ जॉब्स २०२५ हा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या संकटात आहेत आणि कोणत्या नोकरदारांच्या नोकर्या सुरक्षित आहेत, याबद्दल भाष्य करण्यात आले आहे.
या रिपोर्टमध्ये कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या संपतील याबद्दलही नमूद करण्यात आले आहे. यात कॅशिअर्स आणि तिकीट क्लार्क, प्रशासकीय सहायक आणि कार्यकारी सचिव, बिल्डिंग केअरटेकर, क्लीनर आणि हाऊसकीपर, मेटरिअल रिकॉर्डिंग आणि स्टॉक कीपिंग क्लार्क, प्रिंटिंग आणि त्याच्याशी संबंधित मजूर, अकाऊंटिंग, बुक कीपिंग आणि पेरॉल क्लार्क, अकाऊंटंट आणि ऑडिटर, परिवहन वाहन आणि कंडक्टर, सुरक्षा रक्षक, बँक टेलर आणि संबंधित क्लार्क, डेटा एन्ट्री क्लार्क, ग्राहक सूचना आणि ग्राहक सेवेतील कर्मचारी, ग्राफीक डिझायनर, व्यावसायिक सेवेतील नोकऱ्या आणि परीक्षक यांच्या नोकऱ्या संपतील, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.