
खंडणी प्रकरणानंतर सरपंच देशमुख हत्येप्रकरणी विष्णु चाटेला 2 दिवसाची पोलिस कोठडी
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 12/01/2025.
मुंबई,
खंडणीच्या गुन्ह्यात शुक्रवारी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या विष्णू चाटेला सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात पोलिसांनी पुन्हा अटक केली. शनिवारी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश कुणाल जाधव यांनी त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.