Breaking
अपघातब्रेकिंग

वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू , काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीने घटनास्थळी भेट

मुख्य संपादक :

 

वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू , काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीने घटनास्थळी भेट.

 

आणखी किती निरपराध लोकांचा बळी घेणार? पालकमंत्री साहेब जिल्ह्यात लक्ष्य द्या   –  महेंद्र ब्राह्मणवाडे

 

 

गडचिरोली ::

गडचिरोली जिल्ह्यातील हिरापूर येथील इंदिराबाई खेडेकर (वय वर्ष 55) या महिलेचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला. सदर महिला शेतीचे काम करून घराकडे येत असताना डाव धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने महिलेवर हल्ला केला, या हल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून वारंवार अश्या प्रकारच्या घटना होत असल्याने स्थानिक लोकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात मोठा रोष निर्माण होत आहे.

 

 

सदर घटना स्थळी *गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, नितेश राठोड यांनी भेट देऊन मृतक कुटुंबाचे सांत्वन केले.

काँग्रेस पक्षाच्या वतीने सतत नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा म्हुणुन मागणी करीत असताना देखील प्रशासन, पालकमंत्री आणि वनमंत्री यांच्या् कडून या मागणीला घेऊन कानाडोळा केल्या जात आहे. जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या राज्याच्या निवडणुकात व्यस्त आहे. जिल्ह्यातील आमदार खासदारही पूर्णतः निसक्रिय झाले आहे. त्यामुळे अजून किती निरपराध लोकांचा जीव घेण्याची वाट पालकमंत्री महोदय पाहत आहे? असा सवाल गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे. येणाऱ्या दिवसात लवकरच पालकमंत्री आणि वनमंत्र्याच्या घरा समोर ठिय्या आंदोलनही करणार असल्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे