
शेळ्या राखणाऱ्या राखणदाराचा विज पडून जागीच मृत्यू
गडचिरोली
कोनसरी ,
शेळ्या चराईसाठी गेलेल्या इसमाचा विज पडुन मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी 4 वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे घडली. नामे.श्री.शंकर शिंपतवार (45) रा. उमरी असे मृतकाचे नाव आहे.
उमरी येथील शंकर शिंपतवार हे शेळ्या चराईसाठी कोनसरी लगतच्या जंगल परीसरात गेले होते. संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटसह पावसाला सुरवात झाली. अचानक यावेळी शंकर यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच तलाठी नाईक व कोनसरी बिटचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अधीक तपास सुरू आहे