अपघात
मजुर झोपलेल्या शेडवरच टाकली टिप्परमधील रेती ;जालण्यात पाच मजुरांचा वाळूखाली दबुन मृत्यू
मुख्य संपादक

मजुर झोपलेल्या शेडवरच टाकली टिप्परमधील रेती ;जालण्यात पाच मजुरांचा वाळूखाली दबुन मृत्यू ..
जालणा ,
दि.22/2/25 .
पुलाचे काम करणाऱ्या मजुरांवर झोपेतच काळाने झडप घातली. रात्री वाळू घेऊन आलेल्या टिप्परच्या चालकाने मजुर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच वाळू टाकली. त्यामुळे मजूर दबले गेले आणि पाच जणांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.