अपघातब्रम्हपुरी
भरधाव ट्रक ने परभणीत 3 दुचाकींना उडविले ,एक जागीच ठार तर ,चार गंभीर ; संतप्त जमावाने ट्रक पेटवला !
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

भरधाव ट्रक ने परभणीत 3 दुचाकींना उडविले ,एक जागीच ठार तरचार गंभीर ; संतप्त जमावाने ट्रक पेटवला !
परभणी ,
दिनांक 16/2/25.
परभणी मधील गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर एसटी वर्कशॉप ते पिंगळगड नाला दरम्यान एका ट्रक चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून तीन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. या घटनेमध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर अन्य तीन ते चार जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री ८.३० ते ८.४५ च्या सुमारास घडली. यानंतर परिसरातील संतप्त जमावाने हा ट्रक पेटवून दिल्याचा प्रकारही घडला.