
आष्टी वैनगंगा पुलावरून प्रवास करणे झाले धोक्याचे ! सावधान
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चामोर्शी / आष्टी .
दि.18/09/2023 .
आष्टी ते चंद्रपूर महामार्गावर वैनगंगा नदिच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करणे धोक्याच संकेत असून हा पुल जिर्ण झाल्याचे दिसून येत आहे. पुलावर ठिक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले असुन खुप मोठ मोठे खडड्यात पाणी साचले असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनाना मोठी कसरत करावी लागत आहे आहे.
नुकताच आलेल्या पुरामुळे पुलावर पडलेल्या खड्याची खोली वाढली त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुल अरूंद असल्याने ये- जाण करण्यात येणाऱ्या वाहनाना आपला जिव धोक्यात, मुठीत घालुन या पुलावरून वाहन चालवावा लागत आहे.
तसेच पुलावर खड्ड्यात रस्ता का ?रस्त्यात खडड्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पुलावरील खडड्ये बुजवा अशी मागणी नागरीकांकडुन केली जात आहे. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत आहे. परंतु या पुलावरील खड्ड्यामुळे जिवितहानी झाल्यावरच हे खड्डे बुजवीणार की,काय असा प्रश्न व संतप्त नागरिकांना पडला आहे.