महाराष्ट्र
खासदारांचा पगार वाढला , 1 लाखाएवजी मिळणार 1,24,000 रुपये ; महागाई भत्यातही वाढ …
मुख्य संपादक

खासदारांचा पगार वाढला , 1 लाखाएवजी मिळणार 1,24,000 रुपये ; महागाई भत्यातही वाढ …
देशातील जनता वाढत्या महागाईच्या बोझ्याखाली दबत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने खासदारांच्या पगारात मोठी वाढ केली आहे. इतकेच नाहीतर सरकारने माजी खाजदारांच्या पेन्शनमध्येही वाढ केली आहे. ही पगारवाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू झाली आहे. आता खासदारांना दरमहा 1, 24,000 रुपये मिळतील. आधी हा पगार 1 लाख रुपये होता. पगारवाढीसह खासदारांचा दैनंदिन भत्ताही वाढवण्यात आलाय. यात 500 रुपये वाढवण्यात आली आहेत. यानुसार, 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे. माजी खासदारांची पेन्शन 25 हजार रुपयांवरून 31 हजार रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.