महाराष्ट्र
लाल महालात शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारा ; लाल महाल स्मारक समीतीची मागणी …
मुख्य संपादक

लाल महालात शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारा ; लाल महाल स्मारक समीतीची मागणी …
लालमहाल ,
औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात तीन वर्षे ठाण मांडून होता. तेथे मोठ्या हुशारीने पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली. महाराजांच्या या अतुलनीय पराक्रमाची आठवण जपण्यासाठी लाल महालात या प्रसंगाचे शासनाने ऐतिहासिक शिल्प उभारावे, अशी मागणी लाल महाल स्मारक समितीचे हर्ष सगरे, मुकुंद चव्हाण, सुनील तांबट आणि दिनेश भिलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.