महाराष्ट्रराजकिय
कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार ; खोक्यावरील कारवाईनंतर मुख्यमंत्र्याचा इशारा
मुख्य संपादक

कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार ; खोक्यावरील कारवाईनंतर मुख्यमंत्र्याचा इशारा
महाराष्ट्र ,
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार करत दहशत माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या या आरोपीला आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून ताब्यात घेतलं आहे. तसंच त्याच्या घरावरही प्रशासनाकडून बुलडोजर चालवण्यात आला आहे. या कारवाईविषयी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत आम्ही कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, असं म्हणत चुकीचं काम करणाऱ्या प्रवृत्तींना इशारा दिला आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्यावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बोक्या असो, खोक्या असो नाही तर ठोक्या असो, आम्ही कोणालाही सोडणार नाही. सगळ्यांना ठोकणार.”