बांगलादेश सैन प्रमुखाला हटवण्याचा कट भारताने उधळला; अमेरिकेने दिली साथ, पाकिस्तानाला झटका
मुख्य संपादक

बांगलादेश सैन प्रमुखाला हटवण्याचा कट भारताने उधळला; अमेरिकेने दिली साथ, पाकिस्तानाला झटका
भारत अमेरिका बांगलादेश
दि.14/3/25.
भारताच्या मदतीनं बांगलादेश सैन्यातील अंतर्गत सत्तांतर उलथवून लावण्याचं षडयंत्र अपयशी ठरलं आहे. परंतु बांगलादेश लष्कराचे प्रमुख जनरल वकार उज्जमान यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. रिपोर्टनुसार, मागील आठवड्यात भारताने बांगलादेश सैन्याचे प्रमुख जनरल वकार उज्जमान यांना काही पाकिस्तान समर्थक जनरलच्या बंडाला दडपण्यासाठी मदत केली होती.
भारताने अमेरिकेला याबाबत कल्पना देत अशा सत्तांतराने ना केवळ बांगलादेश अस्थिरता येईल तर प्रादेशिक सुरेक्षेचा प्रश्न गंभीर होईल असं सांगितले. त्यानंतर अमेरिकेने याची दखल घेत मोहम्मद युनूस यांना सत्तांतराविरोधात इशारा दिला आणि लष्करातले सत्तांतर टळले. भारताने जनरल वकार उज्जमान आणि अमेरिकन सुरक्षा गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांचे बोलणेही करून दिले.