देश-विदेश
पाकिस्तानात आधी ट्रेन अपहरण अन् आता मिलिट्री बेसवर आत्मघातकी हल्ला; अनेक लोक दगावले
मुख्य संपादक संतोष मेश्राम

पाकिस्तानात आधी ट्रेन अपहरण अन् आता मिलिट्री बेसवर आत्मघातकी हल्ला; अनेक लोक दगावले।
पाकिस्तान ,
दिनांक 14/3/25.
पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेन अपहरणानंतर आता खैबर पख्तूनख्वा भागातील पाकिस्तानी लष्कराच्या तळावर आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात बरेच लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. आत्मघातकी हल्लेखोराने पाकिस्तानी सैन्याच्या तळावर जात स्वत:ला उडवून घेतले आहे. खैबर पख्तूनख्वाच्या टँक जिल्ह्यातील जंडोला मिलिट्री कॅम्पवर हा हल्ला झाला. या हल्ल्यामागे अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर सक्रीय दहशतवादी संघटना तहरीक ए तालिबान पाकिस्तान यांचा हात असल्याचं बोललं जात आहे.