क्राईम
तरुणाला अमानुष मारहाण प्रकरण , धनंजय देशमुखांचे साडु दादा खिंडकर पोलिसांना शरण !
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

तरुणाला अमानुष मारहाण प्रकरण , धनंजय देशमुखांचे साडु दादा खिंडकर पोलिसांना शरण !
बीड ,
दिनांक 13/3/2025
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू असलेल्या सरपंच दादासाहेब खिंडकर यांचाही एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये खिंडकरसह पाच ते सहा जणांकडून एका तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ जुना असून, हा वाद मिटल्याचा खुलासा खिंडकर यांनी केला आहे. दरम्यान, खिंडकर यांच्यावरही जीव घेणा हल्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेऊन स्वतःहून गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज सकाळी दादा खिंडकर पोलिसांना शरण आला. त्याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.