
चामोर्शीत भीषण अपघात तीन जागीच ठार ..एक गंभीर जखमी..
ब्रेकिंग न्यूज
दिनांक 18/ 5/ 2025.
*चामोर्शी* :- चामोर्शी रुग्णालयाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने इको स्पोर्टस कार ला मागून जब्बरदस्त धडक दिल्याने कार मधील असलेले तीन जण जागीच ठार व एक गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे .तसेच तीन जण गडचिरोलीचे तर तर एक जण चामोर्शी गंभीर जखमी या अपघातात विनोद पुंजाराम काटवे वय 45 वर्ष .राजू सदाशिव नैताम वय 45 वर्ष .सुनील वैरागडे 55 वर्ष या तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून एक प्रवासी हा गंभीर जखमी आहे व याला गडचिरोली सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करीत आहेत.
हे चारही कामानिमित्त आष्टी कडे इको स्पोर्ट कार क्र एम एस 33ए 0825 ने आष्टी कडे जात होते.चामोर्शी रुग्णालयाजवळ अचानक पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला जबर धडक दिल्याने अपघात एवढा तीव्र होता की त्याचा आवाज येताच लोकांची गर्दी उसळली त्यात कारचा चेंदामेंदा झाला, असून घटनास्थळी पोलीस पोहोचले. ट्रक चालक फरार झाले आहे ,त्या अपघातामुळे परिसरातील लोकांत हळहळ व्यक्त केली जात आहे .महामार्गावर सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे असे भीषण अपघात होत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात यावा अशी मागणी होत आहे.