” शाळा व्यवस्थापन समिती ” जयनगर यांनी, शाळेला ताला ठोको आंदोलन केले सुरू
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

” शाळा व्यवस्थापन समिती ” जयनगर यांनी, शाळेला ताला ठोको आंदोलन केले सुरू
गडचिरोली ,
चामोर्शी:-
तालुक्यातील जयनगर शाळेतील मुख्याध्यापक व विषय शिक्षिका यां दोन्ही शिक्षकांना बळतर्फ करण्यासाठी जयनगरच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापक समिती व गावकऱ्यांच्या पुढाकाराने आज मंगळवार दि.25.03.2025 पासून शाळेला ताला ठोको आंदोलनाला सुरवात केली आहे .
मुख्याध्यापक , विशेष शिक्षिका यांना जोपर्यंत जिल्हा परिषद प्रशासन यांना बडतर्फ करणार नाही.तोपर्यंत जयनगर शाळेला तालाबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा व्यवस्थापन समितीने संकल्प केलेला आहे.
या ताला बंद आंदोलनाला अनेकांनी. आपला पाठिंबा सुध्दा दर्शविलेला असून आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावरती असल्याचे सांगितले जात आहे.
प्रसंगी न्याय न मिळाल्यास आंदोलन रस्त्यावर येऊन करण्यात येणार असा इशारा देण्यात आला आहे.