दीनानाथ रुग्णालयातील घटणेबाबत चौकशी समीती नियुक्त होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
मुख्य संपादक

दीनानाथ रुग्णालयातील घटणेबाबत चौकशी समीती नियुक्त होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
पुणे ,
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाई केली आहे. रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशाच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली. पैशांअभावी रुग्णालयाने गेटवरुनच गर्भवती महिलेला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार दिले असते तर महिलेचा जीव वाचला असता, असा संताप राज्यभरातून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर कारवाई करा अशी मागणी सुरू आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.