तिकीट चेकिंग मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी, वर्षभरात पावणे पाच लाख प्रकरणे 28 कोटींपेक्षा जास्तचे उत्पन्न
मुख्य संपादक

तिकीट चेकिंग मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी, वर्षभरात पावणे पाच लाख प्रकरणे 28 कोटींपेक्षा जास्तचे उत्पन्न
नागपुर ,
बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात विविध रेल्वे गाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणीच्या विशेष मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी लागली आहे. २८ कोटींपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला प्राप्त झाला आहे. हा आतापर्यंतच्या कमाईचा उच्चांक आहे.
तिकिट न घेताच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे, जनरलचे तिकिट काढून एसीत बसणे, सोबत असलेल्या साहित्याचे (लगेज) तिकिट न काढणे, असा प्रकार अवलंबणाऱ्या बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या तसेच ठिकठिकाणची रेल्वे स्थानके आदी ठिकाणी एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत विशेष तिकिट तपासणी मोहिम राबविली. यात एकूण ४ लाख, ७४ हजार, ४१२ बेशिस्त प्रवासी तिकिट चेकरच्या हाती लागले. त्यातून रेल्वेच्या तिजोरीत २८ कोटी, १६ लाख, ३३ हजार, ६६३ रुपयांची गंगाजळी जमा झाली.