
कुस्तीप्रेमींचा तुफान प्रतिसाद!
बिग बॉस फेम शिव ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत भव्य कुस्ती सोहळा!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
मुख्य संपादक
संतोष मेश्राम
नागपुर :- उमरेड
दिनांक ६/११/२०२४.
पांडव पंचमी निमित्त भोला हुडकी येथे राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्यावतीने (दि.६) भव्य अशी कुस्त्यांची दंगल पार पडली. यावेळी कुस्तीप्रेमींनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहत तुफान प्रतिसाद दिला. याप्रसंगी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातील विजेते शिव ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली. खुल्या गटातील कुस्तीपटूला प्रथम पारितोषिक म्हणून गदा बक्षीस देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी यावेळी चित्तथरारक कुस्त्यांचा आनंद घेतला.