
पाथरीत राडा! माजी आमदार बाबाजानी दुर्याणी यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास मारहाण।
पाथरी,
साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूमी अधिग्रहण संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीमध्ये येथील नगरपरिषद सभागृहामध्ये बैठक पार पडली. मात्र, बैठकीमधील वादाची ठिणगी सभागृह बाहेर दिसून आली. ऐनवेळी नगरपरिषदमध्ये समर्थकांसह दाखल झालेल्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचे पदाधिकारी अलोक चौधरी यांना मारहाण केली. घटनेनंतर पळापळ होऊन काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दुर्राणी यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.