
22नक्षलवाद्यांचा खात्मा ; 31 मार्च 2026 पुर्वी भारत नक्षलमुक्त होणार अमित शाहांची घोषणा
छत्तीसगड ,
22नक्षलवाद्याचा खात्मा 31मार्च 2026 पूर्वी भारत नक्षलमुक्त होणार , अमित शाहांची घोषणा केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी(20 मार्च 2025) छत्तीसगडच्या विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी 22 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली आण 31 मार्च 2026 पूर्वी देश नक्षलमुक्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला.