फॉर्च्युनरच्या किमतीपेक्षा महागडी नंबरप्लेट , केरळच्या व्यावसायिकाने आवडत्या नंबरसाठी खर्च केले 46 लाख
मुख्य संंपादक

फॉर्च्युनरच्या किमतीपेक्षा महागडी नंबरप्लेट ,केरळच्या व्यावसायिकाने आवडत्या नंबरसाठी खर्च केले 46 लाख
केरला ,
दिनांंक 12/4/25.
तुम्ही आतापर्यंत अनेक महागड्या गाड्या पाहिल्या असतील. अनेकांना महागड्या गाड्यांची आवड असते. काहींना तर आपल्या गाडीसाठी व्हीआयपी नंबर प्लेटही हवी असते. यासाठी ते हजारो-लाखो रुपये खर्च करायला तयार असतात. परंतु अलीकडेच केरळमधील एका हौशी व्यक्तीने आपल्या कारच्या नंबर प्लेटसाठी इतके रुपये खर्च केले, जितक्या रुपयात टोयोटा फॉर्च्युनर मिळाली असती. केरळमधील लिटमस सेवन सिस्टम्स कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वेणू गोपालकृष्णन यांनी त्यांच्या 4 कोटी रुपयांच्या लॅम्बोर्गिनी उरुस सुपर कारसाठी ’07 DG 0007′ हा नंबर खरेदी केला आहे. या कारच्या नंबरप्लेटसाठी त्यांनी तब्बल 46 लाख रुपये खर्च केले. हा नंबर केरळमध्ये लिलावात येणारा आतापर्यंतचा सर्वात महागडा नंबर बनला आहे.