गुन्हेगारीदेश-विदेश
अमेरीकेतला कोंबडी चोर …! 3 तासापूर्वी तुरुंगातून सुटुन आला , एक्स गर्लफ्रेंडची पाळलेली कोंबडी घेऊन पळाला ..
मुख्य संपादक

अमेरीकेतला कोंबडी चोर …! 3 तासापूर्वी तुरुंगातून सुटुन आला , एक्स गर्लफ्रेंडची पाळलेली कोंबडी घेऊन पळाला ..
अमेरिका ,
अमेरिकेतल्या एका गुन्हेगाराचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. तो काही तासांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. तिथून तो थेट त्याच्या एक्स गर्लफ्रेंडकडे गेला, तिच्या घरात घुसून त्याने तिची पाळलेली कोंबडी पळविली. आता या व्यक्तीला एक्स गर्लफ्रेंडची कोंबडी पळविणे चांगलेच महागात पडणार आहे. पोलिसांनुसार त्याला या गुन्ह्यासाठी १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.