गुजरात ला मोठा धक्का ! चँम्पियन्स ट्राँफी गाजवणार ग्लेन फिलिप्स दुखापतीमुळे IPL बाहेर।
मुख्य संपादक

गुजरात ला मोठा धक्का ! चँम्पियन्स ट्राँफी गाजवणार ग्लेन फिलिप्स दुखापतीमुळे IPL बाहेर।
न्युझीलंड,
न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने गुजरात टायटन्स संघ सोडला आहे. तो त्याच्या देशात परतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करू शकते. मेगा लिलावात गुजरात टायटन्सने ग्लेन फिलिप्सला १ कोटी ५० लाखांना खरेदी केले होते. पण त्याला कोणत्याही सामन्यात संघाच्या प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली नाही.
मात्र ६ एप्रिलच्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याला फिल्डिंगसाठी बदली खेळाडू म्हणून बोलवण्यात आले. त्याच वेळी ग्लेन फिलिप्सला दुखापत झाली. चेंडू थ्रो करण्याचा प्रयत्न करताना त्याला स्नायूंमध्ये ताण आला. यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर तो संघाच्या सरावातही दिसला नाही. आता त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे.