देश-विदेश
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी ; अचानक आलेल्या पुरात 2 जण वाहुन गेले , 100 लोकांना वाचविले ।
मुख्य संपादक

काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी ; अचानक आलेल्या पुरात 2 जण वाहुन गेले , 100 लोकांना वाचविले ।
काश्मीर ,
दिनांक 21/4/25.
जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये अचानक मोठी ढगफुटी झाली आहे. यामुळे आलेल्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्याने गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारची सकाळ येथील लोकांसाठी भयावह ठरली आहे. या लोंढ्यात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. गावातील अनेक घरे कोसळली असून काही लोक पाण्याच्या वेढ्यामुळे तसेच भूस्खलन झाल्याने घरातच अडकलेले आहेत. या लोकांना वाचविण्याचे काम सुरु करण्यात आले असून आतापर्यंत १०० लोकांना वाचविण्यात आले आहे.