देश-विदेश
‘कामाच्या ठिकाणी झोप लागली तर तो गुन्हा नाही; हायकोर्टाचा निर्णय
मुख्य संपादक संतोष मेश्राम

‘कामाच्या ठिकाणी झोप लागली तर तो गुन्हा नाही; हायकोर्टाचा निर्णय ।
दिनांक 27/2/2025.
कर्नाटक,
कर्नाटकातील एक कॉन्स्टेबल चंद्रशेखरचा व्हिडिओ कामाच्या वेळी डुलकी घेताना व्हायरल झाला. त्यानंतर कॉन्स्टेबलला नोकरीवरून निलंबित करण्यात आलं. या विरोधात कर्मचाऱ्याने हायकोर्टात धाव घेतली ज्यावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आणि आराम करण्याचा अधिकार आहे. वेळोवेळी आराम आणि झोपेचे महत्त्वही न्यायाधीशांनी सांगितले. या प्रकरणात याचिकाकर्त्याला कामाच्या ठिकाणी झोप लागली हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही असं न्यायाधीशांनी म्हटलं.