चामोर्शी तालुक्यातील नवेगाव माल येथे रक्तदानविषय रॅली व जनजागृती ….
उपसंपादक:- स्वप्नील मेश्राम .
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानू या चला रक्तदान करू या “
*चामोर्शी तालुक्यातील नवेगाव माल येथे रक्तदानविषय रॅलीच्या माध्यमातुन जनजागृती करतांना…
उपसंपादक :- स्वप्नील मेश्राम
दिनांक, 3 जुलै 2023 .
आजच्या काळात बऱ्याच ठिकाणी, छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशनच्या वेळी तसेच सिकलसेल ग्रस्त व्यक्ती, गरोदर माता, विविध आजाराने ग्रस्त व्यक्तीला रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासते त्यावर रक्तदान हा एकच उपाय आहे आणि तो उपाय आपल्यासारखे सुज्ञ नागरिकच करू शकतात अशी माहिती ग्रामीण भागात पोहचवणे गरजेचे आहे त्याकरिता अभियानाच्या माध्यमातून रक्तदान विषय जनजागृती करण्यात येत आहे.
दिनांक 03 जुलै 2023 रोज सोमवार ला जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था येनापुर द्वारा संचालित रक्तदाता शोधमोहिम व जनजागृती अभियान व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवेगाव माल यांच्या सहकार्याने चामोर्शी तालुक्यातील नवेगाव माल येथे रक्तदान विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली.
रक्तदानाचे महत्व लहान वयात बालकांना व्हायला पाहिजे आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रक्तदान केले पाहिजे याकरिता बालकांना रक्तदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच गावात रक्तदानविषय जनजागृती रॅली काढून जनजागृतीच्या माध्यमातून युवकांना आवाहन करण्यात आले.
ग्रामीण भागातील युवकानी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले पाहिजे तसेच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर युवकांनी पुढाकार घेऊन वर्षातून किमान एक रक्तदान शिबिर आयोजित केले पाहिजे अशी माहिती क्षेत्र समन्वयक पंकज डायकी यांनी दिली.
समाजामध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे, तरुण पिढीमध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण करणे, निरोगी व तंदुरुस्त असताना देखील जे लोक रक्तदान करत नाहीत त्यांना रक्तदानासाठी प्रेरणा देणे हे कार्य जिल्हा रक्तदाता शोधमोहिम व जनजागृती अभियानाच्या वतीने सुरू आहे.
सदर उपक्रम रक्तदाता शोधमोहिम व जनजागृती अभियानाच्या संचालिका सौ सूनिताताई बंडावार यांच्या मार्गदर्शनात तसेच ग्रामपंचायत नवेगाव मालचे सरपंच सौ. सुप्रिया धूडसे व मुख्याध्यापिका लता बोबाटे मॅडम, यांच्या सहकार्याने राबवण्यात आले. यावेळी क्षेत्र समन्वयक पंकज डायकी, आशा गोंदे आरोग्य सेविका, शिक्षण शिनगारे सर, अंगणवाडी सेविका सुनीता वद्देलवार व सुरेखा चौधरी, आशा वर्कर सविता बांगरे , युवा कार्यकर्ता रुपेश बांगरे, अंगणवाडी मदतनीस भावना बोलीवार, मीराबाई कोहपरे तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.