महाराष्ट्र
साथीदार गेला ! नवरीच्या मांडीवर डोके ठेवत नवरदेवाने सोडले प्राण महाराष्ट्रातील घटना
मुख्य संपादक

साथीदार गेला ! नवरीच्या मांडीवर डोके ठेवत नवरदेवाने सोडले प्राण महाराष्ट्रातील घटना।
सुखी संसाराची स्वप्ने पाहत त्या दोघांनी रेशीमगाठ बांधली. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभही झाला. मात्र, पोटात वेदना होत असल्याचे निमित्त झाले अन् नवरीसह उपचारासाठी दवाखान्यात जाताना वेदना असहा झाल्या. अखेर जीवनसाथीसोबतच्या पहिल्या प्रवासातच नवरदेवाने तिच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडले. काळीज पिळवटणारी ही घटना तालुक्यातील गहाणेगोटा येथे ३ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. नारायण कंवलसिंह बोगा (२६, रा. गहाणेगोटा) असे मृत नवरदेवाचे नाव आहे.