![](https://dankakaydyacha.com/storage/2024/07/sharab-770x431-1.jpg)
गडचिरोली शहरात दारुविक्रीचे वाढते प्रमाण, बंदोबस्त करण्याची मागणी!
दणका कायद्याचा न्यूज
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम
गडचिरोली.
दि.२५जुलै24.
गडचिरोली शहरातील इतरत्र भागात मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू असून दारू विक्रेते खुलेआम व निर्भयपणे दारू विकतांना दिसत आहेत .तर काही दारू विक्रेते फुले वार्डातील एका धर्मस्थळाच्या बाजूला तर काही वार्डातील मुख्य रस्त्यावरील लोकांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरती आप आपलीं दुकाने थाटून . येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला अडथळे निर्माण करतांना दिसत आहेत.
दारू व्यवसाय विक्रेतेत पुरुषांपेक्षा महिलांचा अधिका अधिक वाटा असल्याचे दिसून येत आहे .
तरी गडचिरोली नवनियुक्त ठाणेदारांनी शहरात खुलेआम करीत असलेल्या दारू विक्रेत्यांचा प्रतिष्ठानावर धाड टाकून दारू विक्रेत्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी दलित पॅंथर जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने केलेली आहे .