
अबब !भामरागड मध्ये पुन्हा एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार ; आणखी एका विकृत मुख्याध्यापकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
गडचिरोली / भामरागड
दिनांक 12/30/2025.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील घटना
भामरागड येथे जिल्हा परिषद समूह निवासी शाळेच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संताप जनक प्रकार उघडकीस आलेला आहे. वस्तीगृहातील वार्डांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडतीस झाला. विद्यार्थिनींना सातत्याने अश्लील वागणूक देणाऱ्या नराधमाला भामरागड पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात कठोर कारवाई सुरू आहे.
8मार्च रोजी वस्तीगृहामध्ये जागतिक महिला दिन घेण्यात आला त्यावेळी वस्तीगृहाचे वार्डन यांनी विद्यार्थिनींना गुड टच बॅट टच याची माहिती देत असताना याविषयीच्या त्रासाविषयी न घाबरता सांगावे असे सांगितले दुसऱ्या दिवशी 9 मार्च 2025 रोजी विद्यार्थिनींनी धाडसाने पुढे येऊन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराविषयी वार्डन यांना सांगितले. मुख्याध्यापक नराधम नामे मालु नोगो विडपी वय 50वर्ष याने जुलै 2024.पासुन विविध वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थिनींना एकटे बोलावून अश्लील कृत्ये केली .आणि याबाबत कुठेही कुणाला सांगितले तर मारण्याची व बलात्कार , शाळेतुन काढून टाकण्याची धमकी दिली.
हा प्रकार पालकांना सांगितले तेव्हा पालक आणि भामरागड पोलीस स्टेशन येथे धाव घेतली अकरा मार्च 2025 रोजी तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्याध्यापक नराधमाला अटक केली त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 74,75(2) 351(2)(3) तसेच पोस्को कायद्यांतर्गतकलम 8,10,12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
11 मार्च 2025 रोजी मुख्याध्यापकला अटक केल्यानंतर अहेरी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठरी सुनावली आहे पुढील तपास उपनिरीक्षक धनश्री सगणे करीत आहे. घटनेमुळे संपूर्ण भामरागड परिसरातसंतापजनक वातावरण निर्माण झाले .अशी कृत्ये करणाऱ्यांना पोलिसांनी कठोर कारवाई व शिक्षा करणार असे सांगितले.